QI Spine Blog


नवीन अलौकिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गंभीर पाठदुखीची शस्त्रक्रिया टळू शकते

नवीन अलौकिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गंभीर पाठदुखीची शस्त्रक्रिया टळू शकते

Dr. Garima Anandani, 5 years ago

शोभा शर्मा (नाव बदललेले), 45, गेल्या 5 वर्षांपासून पाठदुखीच्या वेदना सहन करीत होत्या. 2016 साली त्यांना पाठदुखीची तीव्र सणकआली आणि त्यांची हालचाल जवळजवळ सिमित होऊन गेली. वेदना त्यांच्या दोन्ही पायांपर्यंत पसरत होत्या आणि त्यांना 5 मिनिटांहून अधिक काळ उभं राहणे किंवा चालणे अशक्य होऊन बसले. MRIs तपासणीतून असे निष्पन्न झाले होते की त्यांच्या L3-L4, L4-L5 आणि L5-S1 या मणक्यांमधील गाडी सरकून बाहेर येऊ लागली होती, म्हणजे (Slipped Disc). त्यांनीज्या 4 डॉक्टरांचा सल्ला घेतला, त्यासर्वांनी त्यांना शस्त्रक्रिया करून घेण्यास सांगितले. “’शस्त्रक्रिया’ हा शब्दच दिवसरात्र माझ्याभोवती भूतासारखाघूमू लागला. ती काही केवळ शारिरीक वेदना नव्हती तर मानसिकही होती. हळूहळू मला असे वाटू लागले की माझे आयुष्यच सर्व बाजूंनी बांधून ठेवले आहे की काय.” शोभा ने सांगितले. या दरम्यान त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांना QI Spine च्या चिकित्सालयाला भेट देण्याचे सुचवले. “त्या चिकित्सालयातील निदान अतिशय नेमके होते. त्यांच्या तपासणीत अद्ययावत तंत्रांचा वापर होता आणि त्यांच्या अत्याधुनिक तंत्रे वापरण्याने माझ्या वेदनांचे मूळ कारण कळून आले आहे.” तेथे त्यांच्या मणक्याचे संगणकीय विश्र्लेषण (DSA-Digital Spine Analysis) करण्यात आले त्यामुळे त्यांच्या मणक्यातील कमकुवत स्नायू नजरेस आले जे काम करत नव्हते. त्यांच्या त्रासाचे खरे कारण काय आहे हे प्रथमच एखाद्या चाचणीने दिसून आले.

नवीन तंत्रज्ञान पाठ्दुखीवर कशा प्रकारे मदत करू शकते

आपली पाठ हाडे, चकत्या, नसा आणि स्नायुंच्या नरम उतींपासून बनलेली असते. जेव्हा स्नायुंवरील अतिरिक्त भार हाडे आणि गादीसदृशचकत्यांवर तोलला जातो तेंव्हा पाठदुखीला सुरुवात होते. जवळजवळ सर्वच शस्त्रक्रिया MRIs, आणि X-Ray तपासण्यांवर अवलंबून असतात ज्यांमध्ये परिस्थितीच्या केवळ रचनेच्या विश्लेषणांवर भर असतो. DSA सारख्या नविन चाचण्याआपल्या मणक्याच्या कार्यपद्धतींची तपासणी करतात आणि मणक्यांच्या तज्ञांना आपला प्रत्येक स्नायू वेगवेगळा दर्शवतात ज्यामुळे वेदनांचे नेमके कारण समजायला मदतच होते. त्यामुळे उपचारांचे नेमके लक्ष्य साधण्याचा प्रगत दृष्टीकोन वाढवण्यात मदत होते. श्रीमती शोभाच्या बाबतीत, DSA मुळे कमकुवत स्नायू ओळखण्यात आले आणि स्नायूंच्या भार तोलणाऱ्या स्तरांतील कमतरता पण कळून आली. त्यांनी जर शस्त्रक्रिया करून घेतली असती तर त्यांच्या कमकुवत स्नायूंमध्ये बळ आले नसते आणि कदाचित त्यांच्या वेदना परत सुरु झाल्या असत्या. त्यांच्या तज्ञांना एकदा वेदनांचे कारण समजून आल्यामुळे प्राथमिक उपचार नक्की झाले आणि शस्त्रक्रिया हा काही उपाय ठरला नसता. शस्त्रक्रियेची भीती एकदा नाहीशी झाल्यावर, श्रीमती शोभा यांच्यावर प्रत्येक रुग्णावर बेतलेली नेमकी उपचार पद्धती सुरु झाली ज्यामुळे त्यांचे कमकुवत झालेले स्नायू माहित झाले आणि त्यांच्या पुनःनिर्माणाची सुरुवात करता आली. QI Spine चिकित्सालयाचे वेदना कमी करण्याचे प्रगत तंत्र आणि मणक्याच्या व्यक्तिगणिक उपचारांमुळे त्यांची मणक्यावरील शस्त्रक्रिया टळण्यात मदत झाली. “माझी केवळ पाठदुखी नाहीशी झाली नाही तर मी आता पूर्वीपेक्षा मनाने अधिक खंबीर झाले आणि माझ्या दैनंदिन व्यवहाराला सुरुवात करू शकले.” त्या आनंदाने सांगू लागल्या. हल्लीच्या संशोधनाने असे दाखवून दिले आहे की, पाठदुखीच्या बहुतांशी बाबतीत पारंपारीक उपचार पद्धतीच (शस्त्रक्रियेविना) योग्य आहे. शस्त्रक्रिया 5% हूनही कमी बाबतीत गरजेची असते.QI Spine चिकित्सालयात मणक्यावरील शास्त्रशुद्धतज्ञांची भारतातील सर्वात मोठी फळी कार्यरत आहे आणि त्यांनी जवळजवळ 7100 हूनही अधिक रुग्णांना शस्त्रक्रिया टाळण्यात मदत केली आहे. त्यांचे तज्ञ समजावून सांगतात की मणका हा एक अतिशय क्लिष्ट अवयव आहे त्यामुळे पाठदुखीचे नेमके निदान होणे ही अतिशय महत्वाची पहिली पायरी आहे.

Visit our nearest clinic for your first consultation

Recommended Articles